दाताळा उड्डाणपुलाला राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे – रिपब्लिकन स्टुडेंट फेडरेशन ची मागणी.

आज राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त राजस खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन स्तुडेंट फेडरेशन चंद्रपूर च्या वतीने जिल्हाअधिकारी यांना चंद्रपूर येथिल इराई नदीवरील पुलाला राष्टमाता सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे यासाठी शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांचे योगदान भारतात नव्हे तर संपूर्ण जगात सर्वश्रुत आहे,भारतातील स्त्री शिक्षनाच्या त्या प्रणेत्या आहेत त्यानी दलित,मुस्लिम,आणि उपेक्षित समाजातील लोकांसाठी त्यांनी अपमान, तिरस्कार सहन केला आहे आणि त्यांच्या कार्याची जाणीव सर्व भारतीय लोकांच्या हृदयात आहे आणि म्हणून त्यांच्या कार्याची आठवण सदैव अनेक पिढीच्या स्मरणात राहावे म्हणून त्यांच्या स्मृतिदिन ही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी चेतना बरसगड़े, साक्षी दुगे, श्रावस्ती तावाडे, अभिजीत तोतडे, भानेश चिलमिल, शुभम शेंडे, स्वप्निल बरसगड़े, साहिल, हर्षल खोबरागडे, इत्यादी उपसतित होते..