डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञानतपस्या. संस्मरणीय आठवण –2

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतून B A ची पदवी संपादन केल्यानंतर ते बडोदे संस्थानात नोकरी करण्यासाठी गेले परंतु तेथील जातिभेदाने त्यांचा पाठलाग केला व मनस्ताप दिला तशातच त्यांना मुंबईतून तर मिळाली की त्यांचे वडील अत्यवस्थ आहेत म्हणून ते बडोद्याहून मुंबईला आले।वडिलांची भेट घेतली।पुढे सुभेदार साहेबांचे निधन झाले।दुःखाचा डोंगर आंबेडकरी कुटुंबावर आदळला।कालांतराने दुःख हलके झाले।अशावेळी बडोदे संस्थान ने परदेशात चार लायक विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी पाठविण्याची घोषणा केली।डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या संधीचा उपयोग करायचे ठरविले व त्यांनी सयाजीराव गायकवाड यांनी भेट मुंबईला घेतली आणि आपण संधी दिल्यास अमेरिका ला जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा प्रदर्शित केली।सायजीरावणी त्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे सांगितले त्याप्रमाणे त्यांनी अर्ज केला तेव्हा बाबासाहेब व त्यांचे तीन इतर विध्यर्थी अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात दाखल झाले।
या विद्यापीठात आंबेडकरांनी समाजशास्त्र ,अर्थशास्त्र, मानव वंश शास्त्र ,इतिहास हे विषय अभ्यासासाठी निवडले होते।आणि त्यांनी वरील विषयाचा करून अभ्यास चालविला होता।ह्यामुळे त्यांना अर्थशात्रात M A पदवी व पुढे त्याच शास्त्रात Phd प्राप्त झाली।
त्यांच्या अभया करण्याच्या पद्धतीविषयी केळुस्कर गुरुजी पुढे लिहितात,त्यांच्या विद्याव्यासांगासंबंधने येथे दोन शब्द सांगतो।
अमेरिकेस कोलंबिया विद्यापीठात त्यांच्या बरोबर दुसरे जे तीन विद्यार्थी बडोदे सरकारने पाठविले त्यापैकी एकजण मला सांगत असे की ,डॉ आंबेडकरांसारखा विध्यर्थी आपण जन्मात कधी पाहिला नाही।ते सर्वदा अभ्यासात गुंतलेले असत ।ते तेथे दररोज अठरा तास याप्रमाणे अभ्यास करीत ।ते आपला वेळ मुळीच दवडता नसत।ते रात्री 1-1,2-2,वाजेपर्णत अभ्यास करीत।
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे एक सहाध्याही होते त्याने नाव asnodkar।ह्या असनोदकारांनी अशी आठवण सांगितली आहे की,आंबेडकरांची दिनचर्या काशी होती यावर प्रकाश पडतो।
Asnodkar म्हणतात ,ते सकाळी आठ वाजता न्याहरी करून लंडन म्युझिअम मध्ये वाचावयास जात।आणि तेथे सायंकाळी 5 वाजेपर्यंत अभ्यास करीत।आपला वेळ ते अजिबात व्यर्थ जाऊ देत नसत।आपला वेळ खर्च होऊ नये म्हणून ते दुपारचे भोजन व तिसऱ्या प्रहरच चहा सुद्धा घेत नसत।सायंकाळी5 वाजता ते बाहेर पडले म्हणजे त्यांचे डोके शुभेने भडकून जय त्यावेळी ते एखाद्या सवंग उपहारगृहात जाऊन एक पेला bahvrin व एक पाव खात असत।हे त्यांचे संबंध दिवसातले जेवण असे।नंतर थोडा वेळ फेरफटका मारून रात्री आठ वाजताच जेवण ते भरपूर घेत।मग पुन्हा थोड्या वेळाने ते अभ्यासाला लागत।त्यावेळी ते इतके गर्क होत की,1-1,2-2वाजेपर्णत अभ्यास करीत
मी जागा झाल्यावर आंबेडकरांना म्हणत असे की ,अहो आंबेडकर रात्र फार झाली आताझोपी जा त्यावर ते म्हणत की मला लंडन ला राहायला सवड नाही।तेव्हा जितके होईल तितक्या लवकर काम संपवून मला निघून गेले पाहिजे।
ही असनोदकारांची आठवण सांगून केळुस्कर गुरुजी पुढे लिहितात ,असा व्यासंग व परिश्रम केल्यामुळेच वर सांगितलेल्या परीक्षा अवघ्या अडीच वर्षात त्यांना देत आल्या।अशा निर्धाराचा आणि निषयचा विद्याव्यासंगी पुरुष क्वचितच असेल।असे विद्वतरत्न कोणत्याही देशाला आणि समाजाला भूषणावाहच आहेत।
पुढे केळुस्कर म्हणतात ,आमच्या देशात जातिभेदाचे प्रचंड खुल नसते तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अभिनंदन सगळ्या लोकांनी मोठ्या प्रेमाने केले असते।परंतु जातिभेदामुळे येथी अभिजित लोक सुद्धा त्यांची थोरवी मान्य करायला त्यांना दिक्कत वाटते।

—अ.वि.टेंभरे

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *