कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांणी सांगितलेली आठवण पुढीलप्रमाणे आहे।
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे भीमराव यांनी वयाच्या 16 व्या वर्षी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांचा सत्कार केळुस्कर गुरुजींच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला।अभिनंदन पर भाषणे होऊन कार्यक्रम संपल्यावर ते सुभेदार रामजी आंबेडकरांना भेटले व भीमरावांच्या पुढील शिक्षणाविषयी विचारणा केली त्यावेळी सुब्जेदर साहेब म्हणाले की,मला नुसते 50 रुपये पेंशन मिळतात एवढ्या ने माझे व माझ्या कुटुंबाचे भागत नाही।तेव्हा याच्या शिक्षणाला मी कोठून पैसे आणू?
तेव्हा मी त्यांना म्हणालो की,याला श्रीमंत महाराज गायकवाड यांचेकडून काही मदत मिळवून दिल्यास आपण याला कॉलेज मध्ये पाठविण्यास तयार व्हाल काय ?
सुभेदाराने होय म्हटल्यावर मी राजमान्य भीमरावांना नीटनेटका पोशाख करून महाराजांच्या भेटीस नेले आणि त्यांचे दर्शन घेऊन मी त्यास टाऊन हॉल मध्ये केलेल्या भाषणाची आठवण करून दिली।आणि म्हटले,”महाराजांनी असे अभिवचन दिले आहे की,अस्पृश्य वर्गापैकी लायक विद्यार्थी मिळल्यासापन त्याला उच्च शिक्षणासाठी अवश्य मदत करू।तेव्हा मी आपणाकडे असा लायक विद्यार्थी महार जातीसंघांपैकी आणला आहे ।तो नुकताच मॅट्रिक पास झालेला आहे।त्याचे वडील लष्करात सुभेदाराच्या हुद्याला पोहचून पेंशन घेऊन घरी बसले आहेत।आपली आज्ञा असल्यास त्याला आपल्या दर्शनास आणतो।
या गोष्टीचा म्हणाराजास मोठा संतोष वाटून त्यांनी मला त्यास घेऊन येण्यास सांगितले।त्याप्रमाणे भीमरावास महाराजापुढे नेऊन उभे केले।त्यावेळी इंदूप्रकाश चे संपादक उपस्थित होते ।महाराज यांनी काही प्रश्न भीमराव यांना विचारले त्या प्रश्नांची भीमरावणी समर्पक उत्तरे दिली ।ती एकूण महाराज खुश झाले।व भीमरावणं महाविद्यालयिन शिक्षण घेण्यासाठी दरमहा रुपये 25 एवढी शिष्यवृत्ती देण्याचे अभिवचन दिले।याप्रणे त्यांचा कॉलेजमध्ये प्रवेश होऊन ते प्रत्येक परीक्षेत चांल्या रीतीने पास होऊन बी ए झाले।
सुभेदार साहेबाना आपल्या हयातीत मुलगा पदवीधर झाल्याचे पाहायला मिळाले मात्र त्यांचा पुढील अभ्युदय पाहण्यासाठी सुभेदाराने पुढील आयुष्य मिळाले नाही।
— अ.वि.टेंभरे