जागृतीचे श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनाच ।
भाऊराव कृष्णराव गायकवाड
1927 साली झालेल्या महाड सत्यगृहापूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची व माझी फारशी ओळख नव्हती।महाड सारख्या कोकणी भागात चवदार ताळ्यावर समानतेने पाणी भरण्याचा आपला हक्क बाजावणेसाठी जमलेल्या त्या पंधरा हजार सत्याग्रहींची चार चार च्या रांगानी शिस्तीने महाडच्या गावातून चाललेली ती मिरवणूक माझ्या स्मृती पटलावरून बुजली नाही ।सामुदायिक रित्या समानतेने हक्क मिळविण्याची अशी ही पहिलीच चळवळ आमचे समाजात झाली असावी असे वाटते।1927 पर्यंत फार झाले तर आमच्यातील पुढारी वर्गाने सभेत भाषणे करण्यापलीकडे काही केले नव्हते।परंतु महाड च्या सत्याग्रहापासून सक्रिय कार्यास सुरुवात झाली असे म्हणण्यात मला मुळीच संकोच वाटत नाही।महाड येथे जमलेला अफाट जनसमूह हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या चळवळीमुळेच जमलं होता।स्पृश्य वर्गीय लोकांच्या जुलूमला वैतागलेल्या लोकांना या चळवळीमुळे सुरुवातीस थोडाफार अधिक जुलूम सोसावा लागला।परंतु या जुलूमामुळे विस्कळीत असलेला अस्पृश्य समाज सुसंघटित होऊन येणाऱ्या स्थितीस तोंड देण्यास सिद्द झाला ।वाईटातून चांगले निघते म्हणतात त्यातलाच हा प्रकार आहे।
- अ.वि.टेंभरे